--- Page 1 --- महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, नोव्हेंबर ६, २०२०/कार्तिक १५, शके १९४२ ५ गृह विभाग मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक ६ नोव्हेंबर २०२०. अधिसूचना महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम, १९४९. क्रमांक एफएलआर०६२०/प्र.क्र. ९०/राउशु-२.--ज्याअथी, महाराष्ट्र पेय मद्य (किरकोळ विक्रीची कमाल किंमत निर्धारण) नियम,१९९६ मध्ये आणखी सुधारणा करून खालील नियम तात्काळ अंमलात आणले जावेत आणि म्हणून हे नियम, महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम, (१९४९ चा पंचवीस) चे कलम १४३ चे पोट-कलम (३) मधील परंतुकानुसार, तरतूद केल्याप्रमाणे, पूर्वप्रसिद्धीशिवाय तयार करण्यात यावेत, असे महाराष्ट्र शासनास वाटते.
त्याअर्थी, आता, महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम, १९४९ चे कलम १४३ चे पोट-कलम (२) च्या खंड (फ) व (ह-१) नुसार तरतूद केल्याप्रमाणे ब प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा आणि याबाबत महाराष्ट्र शासनास समर्थ करणा-या इतर सर्व अधिकारांचा बापर करून, याद्वारे, महाराष्ट्र शासन, महाराष्ट्र पेय मद्य (किरकोळ विक्रोची कमाल किंमत निर्धारण) नियम, १९९६ मध्ये आणखी सुधारणा करण्यासाठी खालीलप्रमाणे नियम करीत आहे :-- १. या नियमांना, महाराष्ट्र पेय मद्य (किरकोळ विक्रीची कमाल किंमत निर्धारण) (सुधारणा) नियम, २०२० असे संबोधण्यात यावे. २. महाराष्ट्र पेय मद्य (किरकोळ विक्रीची कमाल किंमत निर्धारण) नियम, १९९६ मधील नियम ३ च्या पोट-नियम (३) च्या ऐवजी, खालील पोट-नियम (३) समाविष्ट करण्यात येत आहे :--
“(३) महाराष्ट्र विदेशी मद्य (आयात व निर्यात) नियम, १९६३ मधील नमुना “एल” मध्ये विधीग्राह्म प्रमाणपत्रधारक हा सीमा शुल्क सरहद्दीमधून किंवा सीमा शुल्क बंधित बखारीतून बाहेर काढू इच्छित असलेल्या आयात विदेशी मद्याच्या प्रत्येक ब्रॅन्ड व परिमाणासाठी निर्मितीमूल्य ब किरकोळ विक्रीची कमाल किंमत आयुक्त यांनी विहित केलेल्या विवरणपत्रामध्ये आवश्यक प्रतीत, आयुक्त यांच्याकडे घोषित करेल. घोषणापत्राच्या सर्व प्रती आयुक्त प्रमाणित करतील आणि त्याची एक प्रत मुंबई विदेशी मद्य नियम, १९५३ मधील “एफएल-१” नमुन्यातील व्यापार ब आयात अनुज्ञप्ती धारण करण्या-यास व उर्वरित प्रती स्वतःच्या व अनुज्ञप्ती स्थित असलेल्या जिल्ह्याच्या अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क यांच्या अभिलेखासाठी ठेवतील. ”. महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने, युवराज ब. अजेटराव, शासनाचे उप सचिव. --- Page 2 --- ६ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, नोव्हेंबर ६, २०२०/कार्तिक १५, शके १९४२९ HOME DEPARTMENT
Madam Kama Marg, Hutatma Rajguru Chowk, Mantralaya, Mumbai 400 032, Dated 6th November 2020 NOTIFICATION MAHARASHTRA PROHIBITION AcT, 1949. No. FLR. 0620/ C.R 90/EXC-2.—Whereas the Government of Maharashtra considered that the following rules further to amend the Maharashtra Potable Liquor (Fixation of Maximum Retail Prices) Rules, 1996, should be brought into force at once, and therefore, the rules should be made without previous publication as provided by the proviso to sub-section (3) of section 143 of the Maharashtra Prohibition Act (XXV of 1949) ;
Now, therefore, in exercise of the powers conferred by clauses (f) and (h1) of sub-section (2) of section 143 of the Maharashtra Prohibition Act and of all other powers enabling it in this behalf, the Government of Maharashtra hereby makes the following rules further to amend the Maharashtra Potable Liquor (Fixation of Maximum Retail Prices) Rules, 1996, namely :—
“(3) The holder of valid certificate in Form L as appended to Maharashtra Foreign Liquor (Import and Export) Rules, 1963, shall, by statement in sufficient number of copies as specified by the Commissioner, declare his manufacturing cost and Maximum Retail Price of every pack of Imported Foreign Liquor which he wishes to remove from the custom frontier or custom bond, to the Commissioner. The Commissioner shall authenticate all the necessary copies and return one copy to the Trade and Import license holder in Form FL-l as appended to the Bombay Foreign Liquor Rules, 1953 and retain remaining copies for his record and for the record of the Superintendent of the district in which FL-I license is located.”. By order and in the name of the Governor of Maharashtra, YUVRAJ B. AJETRAO, Deputy Secretary to Government.