--- Page 1 --- COO OCF CO OCF FFF FRR AR AR ARAR ABAD 99 9999359790 महाराष्ट्र शासन क्र:एफएलआर-०७१६/प्र.क्र.१६९/राउशु-३ गृह विभाग, ५ रा मजला (विस्तार), मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक, मंत्रालय, मुंबई -४०० ०३२, दिनांक :- १३ डिसेंबर, २०१९. प्रति, आयुक्त, राज्य उत्पादन शुल्क, म.रा., मुंबई. विषय :- अनुज्ञप्ती स्थलांतरणाबाबत मुंबई विदेशी मद्य नियम, १९५३ व महाराष्ट्र देशी मद्य नियम, १९७३ मध्ये केलेल्या सुधारणांच्या अनुषंगाने, अनुज्ञप्ती स्थलांतरणाच्या करावयाच्या कार्यबाहीबाबत सूचना देणेबाबत... महोदया, शासन अधिसूचना, क्रमांक एफएलआर-०७१६/ प्र.क्र.१६९/ राउशु-३, दि.२९ डिसेंबर, २०१६ अन्वये अनुज्ञप्ती स्थलांतरणाबाबत मुंबई विदेशी मद्य नियम, १९५३ ब महाराष्ट्र देशी मद्य नियम, १९७३ मध्ये सुधारणा केली आहे. याअनुषंगाने अनुज्ञप्ती स्थलांतरणाबाबत करावयाच्या कार्यवाहीबाबत खालीलप्रमाणे सूचना देण्यात येत आहेत :-
(अ) धोरणांतर्गत स्थलांतराकरीता अनुज्ञप्तीधारक आयुक्त, राज्य उत्पादन शुल्क, मुंबई यांचकडे परिपूर्ण स्वरुपात अर्ज करतील, स्थलांतरासाठी आयुक्त कार्यालयाकडे प्राप्त अर्जाची दिनांकान्वये स्वतंत्र आवक नोंदवही ठेवण्यात यावी. नोंदवहीतील कालक्रमानुसार तयार यादीतील स्थलांतराच्या प्रस्तावाची आवश्यक ती कागदपत्रे प्राप्त झाल्यानंतर त्याबाबतची पडताळणी पूर्ण करुन आयुक्त कार्यालयामार्फत शासनास प्रस्ताव सादर करण्यात येतील. (ब) जिल्हयाबाहेर होणाऱ्या स्थलांतराबाबतच्या नोंदवही सोबत जिल्हयांतर्गत एका तालुक्यातून दुसऱ्या तालुक्यात होणाऱ्या स्थलांतराची स्वतंत्र नोंदवही ठेवण्यात यावी. (क) जिल्हयाचा स्थलांतराचा कोटा संपल्यानंतर नोंदवहीत स्थलांतराचा कोटा संपल्याची नोंद लाल शाईने घ्यावी. आपला, eg (सु.श.यादव) कक्ष अधिकारी, गृह विभाग, महाराष्ट्र शासन €६0७-३१२०१९५पटलावर ठेवणे License Sifting Noti’icalion 2&,42.209h- पटलावर ठेवणेबादत 5/२-०६९-२०१६ ७०८४