



मनोगत
मुलतः मद्य पेयाचे नियमन हा गुंतागुंतीचा व कालानुरुप स्वरुप बदलणारा विषय असुन सामाजिक, सांस्कृतिक आणि आर्थिक बाबींच्या अनुषंगाने त्यात वेळोवेळी सुधारणा होणे क्रमप्राप्त ठरते. सर्व बाबी प्रिंट स्वरुपात छापुनही त्यात तद्नंतरचा होणारा बदल त्या स्वरुपाला कालबाह्य करतो. तसेच त्याला शासनाचे व मा. आयुक्त महोदयांचे आदेशांची सांगड घालणे कठीण असते. या सर्व अडचणींचा विचार करुन तसेच वेळोवेळी शासनाचे व मा. आयुक्तांचे अधिसुचना, आदेश व परिपत्रके यांच्या सोबतच मा. न्यायालयांचे आदेश इत्यादींमुळे दारुबंदी अधिनियम व त्याअंतर्गत असलेल्या नियमांमध्ये लागु होणारे बदल समायोजित करुन Just Click वर Digital Excise Manual द्वारे उपलब्ध करुन देण्यात येत आहे. हा डिजिटल कंटेंट निरंतर अद्यावत होणार असल्याने त्यामध्ये सहकारींचे अनुभव ब्लॉग द्वारे अथवा ट्रेनिंग मटेरीअल द्वारे सामाविष्ट करता येईल. तसेच या वेबसाईट वर उपलब्ध नसलेले आदेश देखील सामाविष्ट करता येतील त्याकरीता खालील ईमेलवर संपर्क साधुन त्यांना आपले नावानिशी यात महत्वपुर्ण योगदान देता येईल.
असे परस्परसंवादी, सुलभ, अद्ययावत, कालानुरुप नियंत्रित आवृत्ती असलेले Digital Excise Manual Volume I सादर करण्यास अतिशय आनंद होत असुन यासाठी मा. ना. शंभुराजे देसाई, मंत्री, राज्य उत्पादन शुल्क, मा. प्रधान सचिव श्री. मिलींद म्हैसकर, तत्कालीन मा.आयुक्त कांतीलाल उमाप यांनी व सध्याचे मा. आयुक्त डॉ. विजय सुर्यवंशी यांनी या कार्याकरीता प्रोत्साहन दिले त्याबद्दल त्यांचे आणि स्वाती काकडे (अधीक्षक), प्रमोद राजोते व आकाश जाधव (दुय्यम निरीक्षक) तसेच अधीक्षक व विभागीय उप आयुक्त कार्यालय नागपुर व पुणे येथील अधिकारी व कर्मचारी यांनी याकरीता परीश्रम घेतले त्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त करुन हा Digital & Interactive Excise Manual Volume I सादर करीत आहे.
धन्यवाद!
Mohan Varde, DDC, Pune.
B.E., M.S.(Tech.Oprn), MCM, LLB.
(myexcise1@gmail.com)