--- Page 1 --- आयुक्त, राज्य उत्पादन शुल्क, महाराष्ट्र राज्य, मुंबई, यांचे कार्यालय @ दुसरा मजला, जुने जकात घर, शहिद भगतसिंग मार्ग, फोर्ट, मुंबई -- ४०००२३. 5 E-mail 2 excise.desk4@gmail.com Tel. No. ०२२ २२६६३६८५ 3, ७०५७७४५७४ २ ७७७४७॥ विषय:- वाईन उत्पादनाबाबत सुचना. परिपत्रक क्र. बीआरएल ११२०१२/१६१९/७ २/पाच-अ मुंबई ०० जुन, २०२३ वाईन उत्पादन करणाऱ्या उत्पादकांच्या विविध संघटनांनी वाईन उत्पादन करताना त्यांना येणाऱ्या अडचणींबाबत त्यांची निवेदने सादर केली होती. त्यांनी सादर केलेल्या निवेदनांमध्ये उपस्थित मुद्ांबाबत आढावा घेण्यात आला. सध्या केंद्र शासन व राज्य शासन हे उद्योगांना प्रोत्साहन देण्याचे धोरण राबवित असुन व्यवसाय सुलभीकरण अंतर्गत उद्योगांच्या अडचणी सोडविणे आवश्यक आहे. सबब त्यामधील ज्या मुद्दांवर तातडीने कार्यवाही करणे आवश्यक आहे. अशा मुद्दांबाबत वाईन उत्पादकांनी मांडलेल्या अडचणी विचारात घेवुन खालील प्रमाणे सुचना देण्यात येत आहेत.
अ) साठवणुक व इतर टाक्यांचे गेजिंग वैध मापन शास्त्र विभागाकडुन करुन घेणे :- महाराष्ट्र बिअर व वाईन निर्मीती नियम, १९६६ मधील नियम ६ (१०), ६ (११) नुसार सर्व साठवणुकीच्या व वापरातील टाक््यांचे व साधनांचे गेजिंग प्रभारी अधीकाऱ्यांच्या उपस्थितीत करण्याबाबत तरतुद आहे. तसेच ज्यावेळी एखाद्या टाकीच्या परिमाणामध्ये बदल होत असेल किंवा नव्याने वापरात येत असेल अशा वेळी देखील गेजिंग केल्याशिवाय त्याचा वापर करु नये असे नमुद आहे. सर्वसाधारणपणे वैध मापन शास्त्र विभागाकडुन टाक््यांचे गेजिंग प्रमाणीत करण्यात येते. मात्र ay मापन शास्त्र विभागाने त्यांच्या नियमावली मधुन पेट्रोलियम टाक्या वगळता इतर टाक्यांची गेजिंग (कॅलिब्रेशन) करण्याबाबत असणारी तरतुद वगळली आहे त्यामुळे सध्या गेजिंग प्रमाणित होत नाही. वाईन वर आकारण्यात येणारे उत्पादन शुल्क हे मुल्याधारीत असल्यामुळे वाईनच्या टाक्यांचे मोजमाप व उत्पादकाकडुन प्राप्त होणारे उत्पादन शुल्क याचा थेट संबंध राहत नाही. बऱ्याच वेळा बाईन उत्पादनानंतर लगेचच बाटलीबंद करण्यात येते. तसेच वाईन निर्मीती व साठवणुकीसाठी स्टील टाक्या वापरण्यात येत असल्याने सदर टाकींच्या आकारात फरक संभावत नाहीत. या सर्व बाबी विचारात घेता वाईनच्या गेजिंग बाबतीत सनदी यांत्रिकी अभियंत्याने प्रमाणीत केलेले टाक््यांचे गेजिंगचे चार्ट ग्राह्य धरण्यात यावेत व स्टील टाक्यांच्या आकारमानात बदल न झाल्यास दर पाच वर्षांनी पुर्नःगेजिंगचा आग्रह धरण्यात येवु नये.
आ) वाईन नमुना विश्लेषण :- महाराष्ट्र बिअर व बाईन निर्मीती नियम, १९६६ मधील नियम ९ नुसार वाईन नमुना विश्लेषणाबाबत तरतूद आहे. प्रत्येक बॅचसाठी स्वतंत्र नमुना राज्य शासन मान्य प्रयोग शाळेतून तपासून घ्यावा लागत असल्यामुळे अनेक वेळा अहवाल प्राप्त होण्यास उशीर होतो. अश्या वेळी तयार उत्पादन विक्रीविना पडून राहते त्यामुळे उत्पादकाचे आर्थिक नुकसान होते. या बाबत सुधारीत सुचना देण्यात येतात कौ, नियमातील तरतुदीनुसार प्रथम अनुज्ञप्तीधारकाच्या प्रयोगशाळेत तपासुन वाईन विक्रौस परवानगी द्यावी. तद्नंतर शासकोय Scanned with CamScanner ee EET BSP ree “० --- - --- Page 2 --- विश्लेषण अहवालात त्रुटी आढळल्यास नियमातील तरतुदीनुसार या कार्यालयास सविस्तर अहवाल सादर करावा ) बीआरएल अनुज्ञप्ती घटकांची उत्पादन व विक्री क्षमता :- महाराष्ट्र बिअर व वाईन
निर्मीती नियम, १९६६ मधील नियम ३ नुसार बाईन उत्पादनासाठी बीआरएल अनुज्ञप्ती देण्यात येते. वाईन उत्पादनासाठी बीआरएल अनुज्ञप्ती मंजुर करतेवेळी उत्पादन क्षमतेबाबत मर्यादा घालुन देण्याबाबत नियमामध्ये तरतुद नाही. तथापि बाईन उत्पादनासाठी अनुज्ञप्ती प्रदान करताना | उत्पादन क्षमतेची मर्यादा घालण्यात येते. बहुतांशवेळा ही मर्यादा अनुज्ञप्तीथारकाची साठवणुक क्षमता विचारात घेवुन अनुज्ञप्तीवर नोंदविण्यात येते. तथापि वाईन उत्पादक वर्षातुन एकापेक्षा अधीक वेळा उत्पादन घेत असल्याने ही मर्यादा ओलांडली जाते. सदरची मर्यादा ओलांडल्यानंतर त्यास वेगळी परवानगी घेण्यास कळविले जाते. तथापि अशा प्रकारची वेगळी परवानगी | देण्याबाबत कोणतेही प्रावधान नाही, त्यामुळे अनुज्ञप्तीधारकाने लागु असलेल्या विहीत शुल्काचा भरणा केल्यास उत्पादन क्षमता वाढीसाठी कोणत्याही वेगळ्या परवानगीची आवश्यकता नाही. मात्र अधौक्षकांनी अनुज्ञप्ती शुल्क आकारण्यासाठी वाढीव उत्पादनाची नोंद अनुज्ञप्तीवर घेण्याची कार्यवाही करावी.
ई) लेबल न लावता वाईनची साठवणुक करण्याबाबत :- महाराष्ट्र बिअर व वाईन निर्मीती नियम,१९६६ मधील नियम ११ (६) नुसार वाईन बाटलीबंद केल्यानंतर ती ताबडतोब सिलबंद करुन त्याचे लेबलींग करणे आवश्यक आहे. तथापि तयार झालेली बाईन एकाच वेळी बाटलीबंद करावी लागते, अन्यथा ती खराब होण्याची शक्यता असते. तद्नंतर ती वाईन मागणीनुसार वेगवेगळ्या राज्यांमध्ये किंवा देशांमध्ये पाठविली जाते. अशावेळी सदरील वाईन नेमक्या कोणत्या ; | ठिकाणी पाठवयाची आहे याबाबत उत्पादक ही अनभिज्ञ असतात. तसेच काही वाईन उद्योग बाटली बंद वाईन रॅकोंग साठी ठेवतात. त्यामुळे साठवणुकोवेळी वाईनच्या बाटल्यांवर लेबल लावण्याबाबत आग्रह धरण्यात येवु नये, मात्र बाईन वितरणापुर्वी महाराष्ट्र बिअर व वाईन निर्मीती — मधील नियम ११ मधील (२)(७) किवा २(७) नुसार आवश्यक लेबल लावल्याशिवाय -कोणत्याही परिस्थितीत वाईनचे वितरण करण्यात येवु नये. उपरोक्त सर्व सुचनांची तंतोतंत अंमलबजावणी होईल, याची दक्षता घ्यावी. | Cy | a (डॉ. प र शी)
आयुक्त, राज्य उत्पादन शुल्क, महाराष्ट्र राज्य, मुंबई प्रति, १. या कार्यालयातील सर्व राजपत्रित अधिकारी २. सर्व विभागीय उप आयुक्त, राज्य उत्पादन शुल्क ३. सर्व अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क ४. सवे वाईन उत्पादक घटक (मार्फत संबंधीत अधीक्षक) ५. सर्व वाईन घटकावबरील प्रभारी अधिकारी (मार्फत संबंधीत अधीक्षक) ६, या कार्यालयातील सर्व कार्यासने, अभिलेख शाखा (५ प्रती) Scanned with CamScanner