--- Page 1 --- आयुक्त,राज्य उत्पादन शुल्क महाराष्ट्र राज्य, मुंबई यांचे कार्यालय जुने जकात घर, दुसरा माळा, शहीद भगतसिंग मार्ग, मुंबई -” ४०० ०२३. विषय :- प्रसारमाध्यमांकडे विभागातील माहिती / कारवाई इत्यादीबाबत मुलाखत देण्याबाबत. परिपत्रक . क्रमांक :- एफएलआर ११२०२०/२२०४/सात मुंबई, दि. २६ फेब्रुवारी, २०२०.
राज्य उत्पादन शुल्क विभाग हा मद्य, मद्यार्क अशा उत्पादन शुल्क पात्र वस्तुच्या निर्मिती ते विक्री पर्यंतच्या व्यवहारावर नियंत्रण ठेवतो. या विभागामार्फत मोठया प्रमाणात अवैध मद्यविक्री विरुध्द कार्यवाही करण्यात येते. तसेच विभागातील बरीच माहिती ही गोपनीय व संवेदनशील स्वरुपाची असते. त्यामुळे विभागातील माहिती / कारवाई इत्यादीबाबत प्रसारमाध्यमांकडे माहिती अथवा मुलाखत देताना तसेच यापुढे माध्यमांशी कोणी बोलावे याबाबत मार्गदर्शक सुचना या परिपत्रकाद्वारे सर्वाना सुचित करण्यात येत आहेत. १. कोणत्याही प्रसारमाध्यमांकडे विभागातील माहिती / कारवाई इत्यादीबाबत कार्यालय प्रमुख तसेच विभाग प्रमुख यांनीच मुलाखत देणे. २. अपुऱ्या माहितीच्या आधारे चुकीच्या व गैरसमज निर्माण करणारी माहिती प्रसारमाध्यमांना पुरविण्यात येवु नये. मुलाखत देताना अभ्यासपूर्ण ब आकडेवारीसह माहिती द्यावी. ३. कार्यालय प्रमुख तसेच विभाग प्रमुख यांनी प्रसारमाध्यमांना माहिती पुरवितेवेळी या विभागाच्या संकेतस्थळावर सविस्तर माहिती उपलब्ध असल्याचा उल्लेख करावा.
सदर सुचनाची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी व सदर परिपत्रकाची पोच देण्यात यावी. em ( कांतीलाल बा. उमाप ) आयुक्त, राज्य उत्पादन शुल्क, महाराष्ट्र राज्य, मुंबई. प्रति, १) सर्व विभागीय उप आयुक्त, राज्य उत्पादन शुल्क. २) सर्व अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क. ३) या कार्यालयातील सर्व राजपत्रित अधिकारी. ४) अभिलेख शाखा. |