--- Page 1 --- महाराष्ट्र शासन गृह विभाग मंत्रालय (विस्तार), ५ बा मजला, दालन क्र.५५३, मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक, मुंबई ४०० ०३२. दूरध्वनी क्र ०२२-२२०२७०७४ Email ID : exc3.home@maharashtra.gov.in क्रमांक : बीडब्ल्यूआर-११२१/प्र.क्र.१८७ (भाग-१)/राउशु-३ दिनांक : ०४ एप्रिल, २०२२ प्रति, आयुक्त, राज्य उत्पादन शुल्क, महाराष्ट्र राज्य, मुंबई. विषय :- सुपर मार्केट किंबा बॉक-इन-स्टोअरमध्ये कुलूपबंद कपाटामधून (57! 11 आलण) पध्दतीने बाईनची विक्री करण्याची संकल्पना राबविणे. नियमात दुरुस्ती करण्याकरिता प्रारूप अधिसूचनेबर हरकती व सूचना मागविण्याबाबत. महोदय, राज्य मंत्रिमंडळाच्या दि.२७.१.२०२२ च्या बैठकीत सुपर मार्केट किंबा बॉक-इन-स्टोअरमध्ये कुलूपबंद करता येईल अशा कपाटामधून (५॥र्था 11 5॥ण), मद्यसेबन परवानाधारकास सीलबंद बाटल्यामध्ये केवळ बाईनची विक्री करण्यास परवानगी देण्यासाठी नियमात सुधारणा करण्यास मान्यता दिली आहे.
२. सदर निर्णयाच्या अनुषंगाने विशेष परवाने आणि अनुज्ञप्ती नियम, १९५२ मध्ये सुधारणा करण्यासाठी महाराष्ट्र दारुबंदी अधिनियम, १९४९ च्या कलम १४३ मधील तरतूदीनुसार प्रारुप नियमांच्या मसूद्यावर नागरिकांच्या हरकती/ सूचना मागविण्याचा निर्णय झाला आहे. त्यानुषंगाने प्रारूप नियम शासन अधिसूचना, दि.३१ मार्च, २०२२ अन्बये शासन राजपत्रात प्रसिध्द करण्यात आले आहेत. (प्रत सोबत). सदर प्रारुप नियमांबाबत असलेल्या हरकती व सूचना आपल्या कार्यालयाकडे टपालाद्वारे अथवा dycomm-inspection@mah.gov.in ई-मेलवर पाठविण्याबाबत नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे.
३. यानुषंगाने आपणास कळविण्यात येते कौ, राज्यातील नागरिकांच्या माहितीसाठी सदर अधिसूचना विभागाच्या संकेतस्थळावरही प्रसिध्द करण्यात याबी व या अधिसूचनेबाबत राज्यातील प्रमुख वर्तमानपत्रात (मराठी व इंग्रजी) / माध्यमांमध्ये व्यापक प्रसिध्दी देण्याची कार्यबाही तातडीने करण्यात यावी. तसेच, सदर प्रकरणी नागरिकांकडून प्राप्त होणा-या हरकती / सूचनांबाबतचे कामकाज हाताळण्यासाठी आपल्या कार्यालयातील एका जबाबदार अधिका-याची समन्वय --- Page 2 --- अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात यावी. ४. उपरोक्त अधिसूचनेद्वारे विहित केलेला ९० दिवसांचा कालावधी संपल्यानंतर नागरिकांकडून प्राप्त झालेल्या हरकती /सूचना यांचा सविस्तर तपशील आपल्या अभिप्रायासह शासनास सादर करण्यात यावा, ही विनंती. "आदयपूर्वक | आपला सहपत्र : वरीलप्रमाणे पप ( युवराज ब. अजेटराव ) उप सचिव, महाराष्ट्र शासन. प्रत, कार्यासन राउशु-३ (संग्रहार्थ). --- Page 3 --- RNI No. MAHBIL /2009/37831 महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब
वर्ष ८, अंक ¥3(4)] गुरुवार, मार्च ३९, २०२२/चैत्र ९०, शके ९९४४ [पृष्ठे १९०, किंमत : रुपये ९.०० असाधारण क्रमांक ९०९ प्राधिकृत प्रकाशन महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र अधिनियमांन्वये तयार केलेले (भाग एक, एक-अ आणि एक-ल यांमध्ये प्रसिद्ध केलेले नियम व आदेश यांव्यतिरिक्त) नियम व आदेश. गृह विभाग मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक ३१ मार्च, २०२२. अधिसूचना महाराष्ट्र दारुबंदी अधिनियम. क्रमांक बीडब्ल्युआर-११२१/प्र.क्र. १८७ (भाग-१)/राउशु-३.---महाराष्ट्र दारुबंदी अधिनियम, १९४९ (१९४९ मुंबईचा पंचवीस) मधील
कलम १४३ च्या पोट-कलम (२) (ख) द्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा आणि याबाबतीत त्यास समर्थ करणाऱ्या इतर सर्व अधिकारांचा वापर करून महाराष्ट्र शासनाने विशेष परबाने आणि अनुज्ञप्ती नियम, १९५२, मध्ये सुधारणा करण्याचे योजिलेल्या नियमांचा पुढील मसुदा हा त्यामुळे बाधा पोहोचण्याची शक्यता असलेल्या सर्व व्यक्तींच्या माहितीकरिता, उक्त अधिनियमाच्या कलम १४३ च्या पोट-कलम (३) द्वारे आवश्यक असल्याप्रमाणे याद्वारे प्रसिद्ध करण्यात येत आहे ; आणि याद्वारे अशी सूचना देण्यात येत आहे की, उक्त मसुदा, महाराष्ट्र शासनाकडून दिनांक २९ जून २०२२ नंतर विचारात घेण्यात येईल. २. उपरोक्त दिनांकास किंबा त्यापूर्वी, उक्त मसुद्याच्या संबंधात, कोणत्याही व्यक्तीकडून ज्या कोणत्याही हरकती किंबा सूचना, आयुक्त, राज्य उत्पादन शुल्क, महाराष्ट्र राज्य, दुसरा मजला, जूने जकात घर, शहीद भगतसिंग मार्ग, फोर्ट, मुंबई-४०० ०२३ यांच्याकडे टपालाद्वारे अथवा dycomm-inspection@mah.gov.in UI ई-मेल बर प्राप्त होतील त्या शासन विचारात घेईल.
प्रारूप नियम १. या नियमांना, विशेष परवाने आणि अनुज्ञप्ती (सुधारणा) नियम, २०२२ असे संबोधण्यात याबे. २. विशेष परवाने आणि अनुज्ञप्ती नियम, १९५२, मधील नियम ६ नंतर खालील नियम समाविष्ट करण्यात येत आहेत :--- “ ७. सुपर मार्केटमध्ये मांडणी किंबा शेल्फद्वारे सीलबंद बाटलीमध्ये वाईन विक्रो परवान्यासाठीचा अर्ज- (१) किमान १०० चौ.मीटर क्षेत्रफळ असलेल्या ब स्वतः स्वयंसेवेने खरेदी करण्याची सुविधा असलेल्या तसेच, महाराष्ट्र दुकाने व आस्थापना (नोकरीचे ब सेबा शर्तीचे विनियमन) अधिनियम, २०१७ (महा. २०१७ चा एकसष्टावा) च्या कलम ६ अन्वये नोंद असलेल्या सुपर मार्केट किंवा बॉक-इन-स्टोअरचा कोणताही मालक किंवा व्यवस्थापक, मुंबई विदेशी मद्य नियम, १९५३ च्या नियम ७० डी अंतर्गत जारी केलेल्या फॉर्म एफएलएक्स/सी परवाना धारण केलेल्या कोणत्याही व्यक्तीस, सीलबंद बाटल्यांमध्ये बाईन विक्रीसाठी त्यांच्या आस्थापनेमध्ये भाग चार-ब-१०१-१ (१) --- Page 4 --- 2 महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, मार्च ३९, २०२२/चैत्र १०, शके १९४४
मांडणी किंबा शेल्फ उभारू इच्छित असल्यास, जिथे त्याचे दुकान आहे त्या जिल्ह्याच्या अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क यांच्याकडे ई-३ नमुन्यात शुल्क रु. १००/- भरणा केलेल्या चलनासह परवान्यासाठी अर्ज करेल. (२) अर्जदाराचा अर्ज प्राप्त झाल्यानंतर ब अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क यांना प्रस्ताव परिपूर्ण असल्याची खात्री झाल्यानंतर, बाईन विक्रीची प्रस्तावित जागा ही नियमातील तरतुदीनुसार आणि राज्य शासनाने किंबा आयुक्त, राज्य उत्पादन शुल्क यांनी वेळोवेळी दिलेल्या निर्देशानुसार योग्य असल्यास व अनुज्ञप्ती मंजुरीसाठी आक्षेप नसल्यास, रु.१००० एवढी अनामत रक्कम आणि सदर अनुज्ञप्तीचे आयुक्त, राज्य उत्पादन शुल्क यांनी वेळोबेळी निश्चित केलेले अनुज्ञप्ती शुल्क बसूल करून नमुना ई-४ ही अनुज्ञप्ती मंजूर करू शकतात. (३) खालील जागेच्या बाबतीत उप नियम (२) अन्वये अनुज्ञप्ती मंजूर करण्यात येऊ नये,-
(अ) को जे, अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क यांच्या मते, बाईन विक्रोसाठी असलेला मांडणी किंबा शेल्फ योग्य रितीने मांडलेला नाही अथबा जागेमध्ये एकापेक्षा जास्त मांडणी किंबा शेल्फ आहेत किंवा २.२५ घनमीटर पेक्षा जास्त घनफळ असलेली मांडणी किंबा शेल्फ असल्यास ; अशा मांडणी किंबा शेल्फला आवश्यकतेनुसार कुलुपबंद करता येत नाही; अशी मांडणी किंबा शेल्फ सुपर मार्केट किंबा बॉक-इन-स्टोअरच्या प्रवेशद्रारात किंबा समोरच्या भागात ठेवले असल्यास आणि अशो मांडणी किंबा शेल्फ रस्त्यावरून जाणाऱ्यांच्या सहज नजरेस पडत असल्यास ; किंबा (ब) अशी जागा कोणत्याही महानगरपालिकेच्या किंबा ' अ ” किंबा ' ब ” वर्गाच्या नगरपालिका हद्दोत असेल, तर अशा दुकानापासून ५० मीटर अंतराच्या आत ब इतर ठिकाणी असल्यास, १०० मीटरच्या आत कोणतीही शैक्षणिक किंवा धार्मिक संस्था किंवा कोणताही राष्ट्रीय व्यक्तीमत्त्वाचा पुतळा असेल ; किंबा
(क) महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचा बस थांबा, स्थानक किंबा आगार या ठिकाणापासून १०० मोटर अंतराच्या आत असेल ; किंवा (ड) अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क किंबा त्यांनी प्राधिकृत केलेल्या अधिकाऱ्यांनी अनुज्ञप्ती मंजूर करण्यापूर्बी जागा मंजूर केली नसल्यास आणि सदरील जागा दुकान स्थापित करण्यास योग्य नसल्याचे लिखित स्वरुपात कारणे नमूद करून प्रमाणित केले असल्यास, स्पष्टीकरण- या पोट-नियमाकरिता--- (एक) “ शैक्षणिक संस्था * म्हणजे कोणतीही पूर्व प्राथमिक, प्रार्थामक किंबा माध्यमिक शाळा ज्यांचे व्यवस्थापन किंवा मान्यता हे स्थानिक प्राधिकरणाकडून किंवा राज्य शासन किंवा केंद्र शासनाकडून आणि विद्यापीठ कायद्यानुसार स्थापन झालेल्या एखाद्या विद्यापीठाशी संलग्न असलेले महाविद्यालय परंतु यामध्ये कोणत्याही खाजगी शिकवणी संस्थेचा समावेश होत नाही ;
(दोन) “ धार्मिक संस्था * म्हणजे एखाद्या धर्माच्या प्रचारासाठी स्थापन झालेलो संस्था आणि त्यात मंदिर, मठ, मशीद, चर्च, ज्यू लोकांचे प्रार्थना स्थान, अग्यारी किंबा इतर असे कोणतेही धार्मिक प्रार्थना स्थळ जे महाराष्ट्र सार्वजनिक न्यास कायदा, १९५० (१९५० चा मुंबई २९) अन्वये व ज्याचे व्यवस्थापन किंबा मालकी सार्वजनिक विश्वस्ताकडे असेल ब नोंदणीकृत असेल आणि राज्य शासनाकडून याबाबतीत विशेष करून आदेशित केलेलो इतर धार्मिक संस्था यांचा समावेश केलेला असेल; (तीन) या उप-कलमाच्या खंड (ब) किंबा (क) मध्ये नमूद केलेले अंतर हे दुकानाच्या प्रवेशद्वाराच्या मध्यबिंदुपासून जबळच्या मार्गाने मोजले जाईल, ज्याने सामान्यतः पादचारी पोहोचतात,---- (अ) एखाद्या संस्थेला जर संरक्षक भिंत असेल तर जवळच्या प्रवेशद्वाराच्या मध्यबिंदूपासून ब जर संरक्षक भिंत नसेल तर संस्थेच्या प्रवेशमार्गाच्या मध्यबिंदूपासून ; किंबा
(ब) महाराष्ट्र राज्य मार्ग परिबहन मंडळाच्या बस थांबा, स्थानक किंबा आगाराला संरक्षक भित असल्यास अशा ठिकाणच्या जबळच्या प्रवेशद्वाराच्या मध्यबिंदूपासून ब जर अशा ठिकाणी संरक्षक भिंत नसेल तर असे बस स्थानक किंबा आगाराच्या जवळच्या हद्दीपासून ; किंवा (क) पुतळ्यास संरक्षक भिंत असल्यास, अशा ठिकाणच्या जवळच्या प्रवेशद्वाराच्या मध्यबिंदूपासून आणि जर अशा ठिकाणी संरक्षक भिंत नसेल, तर …